अंदाजित खर्च

कृती आराखड्याचा अंदाजित खर्च तांत्रिक आभ्यासानंतर विविध कार्यक्रम व प्रकल्पांची कार्यकक्षा ठरवणे शक्य आहे , ज्यावर खर्चाचे स्वरूप ठरेल. म्हणून आता केवळ ठोकळ खर्च सुचवला आहे . हा खर्च केवळ दर्शक व अंदाजित असून तो सर्व अभ्यासांनंतर पुन्हा मांडला जावा . जोडपत्र अ (Annexure A) मध्ये प्रत्येक प्रकल्पाचा अंदाजित खर्च दिला आहे. हा खर्च रु. ७६२.६ दशलक्ष आहे . या पैकी ११८.५ दशलक्ष हा विविध कृतींकरता लागणारा खर्च महानगरपालिकेची विविध खाती उचलतील. कृती आराखड्यात सुचवलेल्या सर्व घटकांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदे आहेत उदा . पालिकेकारता महसूल निर्मिती लोकांचा आर्थिक फायदा , इतर अप्रत्यक्ष फायदे उदा. आरोग्यात सुधारणा , पर्यावरणस्नेही उद्योग निर्मिती नैसर्गिक स्त्रोतांचे जतन व संवर्धन इ . असे फायदा प्रत्यक्ष मोजण्याजोगे नसले तरी हरित आर्थ्कार्नास त्यांचा मोठा हातभार आहे तक्ता ५ मध्ये ढोबळ खर्च व नफा दर्शवला आहे.

प्रकल्पांची कालबध्द मांडणी

इको सिटी प्रकल्प सात वर्षात राबवला जावा. याचे तीन भाग असतील पहिला, दुसरा , व तिसरा हे भाग अनुक्रमे दोन , तीन व दोन वर्षात पूर्ण व्हावेत .

आकृती  ८ - एस.ई.पी.एल निधीचे कालबध्द व्यवस्थापन

प्रकल्पांचे या तीन भागांमध्ये निवडीचे निकष :

(१) प्राधान्यक्रमात मिळालेले गुण

(२) प्रकल्प खर्च व आवश्यक गुंतवणूक

(३) आर्थिक पुरवठ्याचे स्वरूप व परतावा (रिकवरी )

(४) इको सिटीच्या इतर प्रकल्पांशी परस्परावलंबन

(५) अंमलबजावणीची  निकड

 
# #