कृती आराखडा

"सांगली -मिरज-कुपवड करता इकोसिटी "कृती आराखडा" हा माननीय ग्रामीणविकास  मंत्री श्री जयंतराव पाटील यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आला आहे. पर्यावरणीय ,सामाजिक व आर्थिक बाबींचा सर्व परींनी विचार करून चिरस्थायी विकास साध्य करणे हा या प्रकल्पाचा उद्देश्य आहे .भारतीय राज्यघटनेच्या १२व्या परिशिष्टा मधील ७४व्या सुधारणा लोकशाहीत अधिक सामाजिक सहभाग, खासगी क्षेत्राचा सहभाग व  विकेंद्रीकरणावर भर देते. इकोसिटी कृति आराखडा तयार करताना या सुधारणेचा सखोल अभ्यास व वापर केला गेला आहे .

"पर्यावरणावरील भार कमी करणारे, लोक जीवनाचा दर्जा उंचावणारे , शहरी व्यवस्थापन करताना भू व इतर नैसर्गिक स्त्रोतांचे योग्य नियोजन करणारे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नियोजन करणारे व या सर्वांद्वारे  चिरस्थायी विकास साधणारे शहर म्हणजे " इकोसिटी " ही व्याख्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्य केली आहे  . इकोसिटी प्रकल्प राबवताना सुखसोयी व पायाभूत घटकांमध्ये कमालीची सुधारणा होणे आपेक्षित आहे .

इकोसिटी कृती आराखडा दोन ठळक कालबध्द भागांत विभागला आहे.

पहिल्या भागात सर्व घटकांचा समावेश असलेल्या चर्चात्मक पद्ध्तीद्वारे कृती आराखडा तयार केला गेला . या भागात सर्व संबंधित  घटक ओळखणे , त्यांच्याशी संवाद साधणे , पर्यावरणीय सनदे विषयी धोरणे निर्माण करणे , प्रकल्पांच्या संकल्पना लिहिणे, त्यांकरता आवश्यक आर्थिक तरतूद व संस्थांगत  रचना लिहिणे इत्यादी कामे केली गेली .

दुस-या  भागात कृती आराखड्या अंतर्गत सर्व योजना , प्रकल्प  धोरणे राबवले जाणे  अपेक्षित ज्याकरता संस्थात्मक क्षमता वाढवणे , योग्य भागीदार ओळखणे व संबंध प्रस्थापित करणे , आर्थिक तजवीज तसेच इतर संसाधने पुरवणे , खासगी सामाजिक भागीदारीस प्रोत्साहन देणे सुचवले गेले आहे.

 
# #